Home Minister | Aadesh Bandekar | आदेश भाऊजी देणार ११ लाखांची पैठणी | Sakal Media |

2022-03-28 30

महिला वर्गात लोकप्रिय असलेला झी मराठीवरील 'होम मिनिस्टर' हा कार्यक्रम १५ वर्षाहून ही जास्त काळ महाराष्ट्रातील, देशातील तमाम वहिनींचा सन्मान करत आला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर घराघरात पोहोचले. सगळ्यांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांनी 'होम मिनिस्टर' निवडण्यासाठी फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभ्रमंती देखील केली आणि गेल्या अनेक वर्षांपासून देशातील कानाकोपऱ्यातून महिलांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला आहे. लवकरच या कार्यक्रमाचे एक विशेष पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पर्वाच नाव महामिनिस्टर असं आहे.

Videos similaires